वीर जवान दत्तात्रय सकुंडे अमर रहे
अंबवडे(सं.वा) (जि. सातारा) : डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झालेले वीर जवान दत्तात्रय सकुंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.१७) रात्री त्यांच्या गावी अंबवडे( सं. वा.) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी भारत माता की जय, वीर जवान दत्तात्रय सकुंडे अमर रहे अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. (व्हिडिओ - सूरज सकुंडे)